कन्नड, (प्रतिनिधी) तालुक्यातील कन्नड वैजापूर रस्त्यावर बनशेंद्रा सिरजगावदरम्यान : -दुचाकी लिंबाच्या झाडाला धडकून झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवार, १२ रोजी सकाळी ६ वाजता उघडकीस आली. शुभम रमेश सोनवणे (२३) आणि रतन बाळू दिवेकर (२१) दोघेही रा. रेल कनकावती, ता. कन्नड) अशी मृतांची नावे आहेत. रतन गायकवाड यांच्या भाचीचा शिर्डी येथे रविवार ११ रोजी रात्री विवाह होता.
हा विवाह आटोपून रतन दिवेकर व शुभम सोनवणे हे एम. एच. २० जी.टी. ७६२० या दुचाकीवरून कन्नड वैजापूर रस्त्याने घरी परतत होते. बनशेंद्रा सिरजगाव परिसरात दुचाकी अचानक रस्त्याखाली उतरून लिंबाच्या झाडाला जोरात धडकली आणि अपघात झाला. मात्र हा अपघात नेमका रात्री कोणत्या वेळी झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अपघाताची माहिती मिळताच रेल-कनकावतीचे माजी उपसरपंच संदीप मोरे, शबीर शेख, कुणाल सोनवणे, रवी शिंदे, संजय भालेराव, राजू वाघ, गोरख पवार, भैय्या बोर्डे, जयेश जाधव, गणेश डोंगरे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना पुढील उपचारासाठी कन्नड ग्रामीण रुग्णालयात कन्नड-बनशेंद्रा रस्त्यावरील घटना दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा गीते मोतिंगे यांनी तपासणी करून दोघांनाही मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी कन्नड शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.















